Belagavi

संजय पाटलांनी आपली चड्डी घट्ट सांभाळावी : एमएलसी नागराज यादव

Share

भाजपचे बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष, माजी आमदार संजय पाटील यांनी त्यांची चड्डी स्वतः घट्ट पकडावी अशी उपहासात्मक टीका विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी केली.

होय, बेळगाव जिल्ह्यात आणि राज्यात चड्डीचा विषय सध्या चांगलाच गाजतो आहे. त्यातच काँग्रेसवाले चड्डी जाळणार असतील तर माझीही एक चड्डी देतो असे आगीत तेल ओतणारे विधान माजी आ. संजय पाटील यांनी केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस एमएलसी नागराज यादव यांनी, त्यांनी आपली चड्डी काँग्रेसला देऊ नये, आपली चड्डी घट्ट पकडून सांभाळावी असा टोला हाणला. घरोघरी जाऊन युवकांना चड्ड्या गोळा करायला लावण्याचा भाजपचा डाव निषेधार्ह आहे. त्यामुळे चड्डी जाळण्याचे अभियान चालवले आहे अशी टीका त्यांनी केली. पाठयपुस्तकांच्या माध्यमातून शिक्षणाचे भगवेकरण सुरु आहे. रा. स्व. संघाच्या तत्वांना विरोध करणाऱ्यांवर  भाजप सरकार कारवाई करत आहे. यातून ते कोणता संदेश देत आहेत असा सवाल करून एमएलसी नागराज यादव म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करणे, धोरणांवर प्रश्न उठवणे याला मुभा आहे. मात्र आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे सरकार लोकशाही व्यवस्था गुंडाळून टाकत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे असे त्यांनी सांगितले.

एकंदर चड्डीच्या मुद्द्यावरून राज्यातील काँग्रेस-भाजप नेत्यांत सध्या चांगलीच जुंपल्याचे पहावयास मिळत आहे.

Tags: