यंदा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा राज्याभिषेक दिन मोठ्या थाटा-माटात संपन्न झाला. या वेळी बेळगाव येथील शिवप्रेमींनीं भलामोठा भगवा फडकावून लक्ष वेधले .
या आधी रायगडावर शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाला २-३ लाख शिवप्रेमी दाखल होत. पण यंदा कोरोना नंतर तब्बल २ वर्षा नंतर सुमारे ५ लाखाहून अधिक शिवप्रेमी राज्याभिषेक दिन सोहळ्यात सहभागी झाले होते. या वेळी बेळगावच्या छत्रपती शिवाजी नगर येथील शिवप्रेमींनीं फडकाविलेल्या भल्या मोठ्या भगव्या ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . अनेक बेळगांवकरांच्या व्हाट्सअँप स्टेटसला याचे दृश्य पाहायला मिळत आहेत .



Recent Comments