Chikkodi

Theft of 5 goats in Kuganolli village : कोगनोळीत शेळीच्या ५ पिल्लांची चोरी

Share

रात्री उशिरा शेळीची पिल्ले चोरल्याची अजब घटना निपाणी तालुक्यातील कोगनोळी गावात घडली आहे. या अजब चोरीने गावात खळबळ माजली आहे.

होय, बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कोगनोळी गावात चोरीची अजब घटना घडली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ शेजारील एका शेतात बांधलेली शेळीची ४ पिले अज्ञातांनी चोरून नेली आहे. कोगनोळीचे रहिवासी विष्णू जयवंत पाटील यांच्या मालकीची ही पिल्ले आहेत. काल, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या चोरीमुले विष्णू पाटील याना ७० ते ८० हजार रुपयांचा चांगलाच फटका बसला आहे. या चोरीप्रकरणी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

 

Tags: