Accident

Accident in Stavanidhi Ghat: 2 death : स्तवनिधी घाटातील २ अपघातात २ ठार

Share

निपाणी तालुक्याच्या हद्दीतील पुणेबेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. वर स्तवनिधी घाटातील उतारावर काल सोमवारी दुपारी मध्यरात्री झालेल्या स्वतंत्र अपघातात दोघेजण ठार झाले.

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर स्तवनिधी घाटातील उतारावर काल सोमवारी दुपारी ट्रकने मोटरसायकलला ठोकरल्याने मोटरसायकल चालक मूळचा खानापूरचा जाफर नाईकवाडी, वय २५ ठार झाला. त्याचप्रमाणे काल मध्यरात्री पिकअप वाहनाला ट्रकने ठोकरल्याने झालेल्या अपघातात पिकअप चालक अप्पाराव किसन जाधव जागीच ठार झाला. निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या पीएसआय कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच याच स्तवनिधी घाटातील उतारावर ट्रकने कारला धडक दिल्याने कारमधील चौघेजण जागीच ठार झाले होते. त्यानंतर आता याचठिकाणी पुन्हा झालेल्या २ अपघातात दोघांचा बळी गेला आहे.

Tags: