Belagavi

2years old Rutvi Salutes Shivaji Maharaj In Different Way !!  : २ वर्षांची बालिका ऋत्विचे शिवरायांना अनोखे अभिवादन

Share

 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 384 व्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त वर्षांच्या बालिकेने बेळगाव तालुक्यातील येळ्ळूरजवळील राजहंस गडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून अभिवादन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

होय, काल सोमवार, ६ जून हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन अनेक ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा झाला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काल बरोबर 384 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त बेळगाव तालुक्यातील येळ्ळूरजवळील राजहंस गडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला २ वर्षांची बालिका ऋत्वि हिने दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

मच्छे येथील गजानन जैनोजी यांची २ वर्षांची कन्या ऋत्विने छत्रपती शिवरायांचा पुतळा स्वतःच राजहंसगडावर नेऊन प्रतिष्ठापना करून पुतळ्याला दूध आणि पाण्याने अभिषेक घातला. या कृतीतून ऋत्विने शिवरायांवरील प्रेम आणि अभिमान दाखवून दिला आहे. फ्लो

ऋत्विच्या या आगळ्या उपक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. छत्रपती शिवरायांवरील ऋत्विच्या या प्रेमाची, अभिमानाची शिवप्रेमींतून प्रशंसा होत आहे. लहानपणीच चांगले संस्कार केलेल्या तिच्या पालकांचीही बेळगावकरांनी प्रशंसा केली आहे.

 

 

Tags: