Belagavi

युवती-महिलांनी प्रशिक्षण घेऊन प्रगती साधावी : युवानेत्या प्रियांका जारकीहोळी

Share

आर्थिक स्थैर्य असेल तर महिला स्वावलंबी होऊ शकतात. त्यामुळे युवतीमहिलांनी सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्रगती साधावी असे आवाहन युवानेत्या प्रियांका जारकीहोळी यांनी केले.

बेळगाव तालुक्यातील गौंडवाड गावात श्री भैरवनाथ स्व-सहाय्य संघाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना  युवानेत्या प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या, उद्योग, नोकरी, सहकार, राजकारण, साहित्य, सांस्कृतिक, औद्योगिकीकरण, सामाजिक अशा सर्व क्षेत्रांत महिला आज आघाडीवर आहेत ही समाधानाची बाब आहे. एखाद्या कुटूंबाच्या प्रगतीसाठी अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागतो. त्यामुळे महिलांनी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

स्व-सहाय्य संघांमुळे महिलांची आर्थिक प्रगती होत आहे. थोर समाजसेविका सुधा मूर्ती यांच्याप्रमाणे साधेपणाने राहून मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. रेखा सुतार, कल्पना पवार, रोहिणी नाथबुवा, सुमन पाटील, इंदू पाटील, लीलाबाई पिंगट, बाबू दोडमणी, मलगौडा पाटील, ग्रापं सदस्यांसह इतर उपस्थित होते.

Tags: