Belagavi

The power of personality development in the words of Vachan Sahitya: Arvind Jatti;शरणांच्या वचनांमध्ये व्यक्तिमत्व विकासाचे सामर्थ्य : अरविंद जत्ती 

Share

कोणतेही काव्य लिहिले तर त्यामुळे समाजात सकारात्मक बदल झाला पाहिजे. समाजातील नागरिकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. बसवादी शरणांच्या वचनांमध्ये ती ताकद आहे असे मत केंद्रीय बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांनी व्यक्त केले.

खानापूर तालुक्यातील इटगी येथील संभ्रम फौंडेशनचे उदघाटन आणि किरण कल्लाप्पा गणाचारी लिखित ‘कल्पना छायेयल्ली’ या कन्नड काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी बेळगावातील कन्नड साहित्य भवनात पार पडला. अध्यक्षस्थानी कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष मंगला मेटगुड होत्या. या कार्यक्रमाचे उदघाटन करून बोलताना केंद्रीय बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती म्हणाले, विश्वगुरू बसवण्णा यांची वचने सदासर्वकाळ समाजाला मार्गदर्शक ठरणारी आहेत. त्यांच्या व अन्य शरणांच्या वचनांमध्ये, काव्यामध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचे सामर्थ्य आहे. तसे प्रभावी काव्य नवकवींनी लिहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. The power of personality development in the words of Vachan Sahitya: Arvind Jatti

जत्ती पुढे म्हणाले, 2008 पासून वचन व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम आपण राबवत असून आजवर सुमारे 18-20 लाख विध्यार्थ्यांना याचा लाभ करून दिला आहे. मी बैलहोंगलला आलो असता मला एकदा हार्टअटॅक आला होता. ३ स्टेण्ट घातले आहेत. पण माझ्या पत्नीने मला धीर दिला. मरण कोणाला चुकलेले नाही. घरी बसलो तरी मृत्यू येणार अन बाहेर असलो तरी येणार. त्यामुळे घरी बसून राहण्याऐवजी तुमचे कार्य सुरु ठेवा असा सल्ला तिने दिला. त्यामुळे हे काम पुन्हा सुरु ठेवले आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी ‘कल्पना छायेयल्ली’ या कन्नड काव्यसंग्रहाचे प्रकाशन बागलकोटचे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रकाश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा लेखिका संघाच्या अध्यक्ष डॉ. हेमावती सोनोळ्ळी, कर्नाटक राज्य विज्ञान परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, कल्लाप्पा गणाचारी, शिवानंद पाटील, किरण गणाचारी, विजयश्री पाटील आदी उपस्थित होते.

Tags: