Belagavi

Let people live happily, don’t tear their shorts: Kumaraswamy;लोकांना सुखाने जगू द्या, त्यांच्या चड्ड्या फाडू नका : कुमारस्वामी 

Share

राज्यातील जनतेला सुखानेसन्मानाने जगू द्या, तुमच्यातुमच्या चड्ड्या फाडा, पण जनतेच्या चड्ड्या फाडू नका अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस भाजप नेत्यांना सुनावले

बेळगावात रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, एकमेकांच्या चड्ड्या काढल्याने यांना काय मिळते? आधी काँग्रेसवा;यांनी चड्डी काढली. त्यानंतर गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी काँग्रेसची चड्डी फाडू म्हटले. तुमच्या-तुमच्या चड्ड्या जरूर फाडा, पण राज्यातील जनतेच्या चड्ड्या फाडू नका असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.

कुमारस्वामी पुढे म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत यांनी, प्रत्येक मशिदीत मंदिर शोधू नका असा सल्ला दिला आहे. त्यावर काळ ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांनी भागवत यांचा सल्ला ऐकलं पाहिजे असे सांगितले आहे. रघुपति भट यांनी हे थांबविले पाहिजे असे म्हटले आहे. एकीकडे असे बोलायचे अन दुसरीकडे दुसरीच गोळी झाडून समाजाला भडकवायचे. हे कोण करवून घेत आहे? हे सगळे पाहूनही सरकार का ढिम्म आहे? करण्यासाठी दुसरी अनेक कामे आहेत असे कुमारस्वामींनी यावेळी सुनावले.

Let people live happily, don't tear their shorts: Kumaraswamy

उत्तर कर्नाटकाचा विकास होण्यासाठी बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा निर्णय मी घेतला होता. बेळगावात चांगले वातावरण आहे. मूलभूत सुविधा आता थोड्या वाढल्या आहेत. तेंव्हा बेळगावात विधिमंडळ अधिवेशन घेतल्यानंतर 2006 पासून बेळगावातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ झाली आहे. आता अनेक प्रकारचे उद्योग स्थापन करण्यासाठी बेंगळूरनंतर दुसऱ्या टप्प्यातील बेळगाव, कलबुर्गी, मंगळूर अशा शहरात उद्योग स्थापनेसाठी पावले उचलली पाहिजेत अशी सूचना कुमारस्वामींनी केली.

केवळ कित्तूर कर्नाटक, कल्याण कर्नाटक असे नामकरण केल्याने लगेच काही बदल होत नाही. बेळगावात अनेक उद्योग स्थापन करण्याची संधी आहे. त्या दृष्टीने ३ वर्षांत काय केले? तुमचे स्वबळावरील सरकार आहे. दुसऱ्यांच्या पाठिंब्याचे नव्हे. अशी उत्तम संधी वाया का घालवताय? असा सवाल कुमारस्वामींनी सरकारला केला.

पंतप्रधानांना भेटण्यासाठी मुखमंत्र्यांना वेळ दिला जात नाही. ते दिल्लीला जातात अन रिकाम्या हाताने परत येतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही परिस्थिती आहे. केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्याना सन्मानच दिला जात नाही. हा मुख्यमंत्र्यांचा अवमान नाही तर राज्यातील जनतेचा अवमान आहे. राज्यात बदल घडवून अनु असे मुख्यमंत्री सांगतात, नवकर्नाट्क निर्माण करतो म्हणतात. तुम्ही कोणता बदल घडवणार आहेत, कसला नवकर्नाट्क निर्माण करणार? कशाप्रकारचे उद्योग आणणार? केवळ कागदी बाण उडवून चालणार नाही असा टोला कुमारस्वामींनी हाणला.

एकंदर राज्यातील भाजप सरकारला बेळगावात कुमारस्वामी यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे.

Tags: