Vijayapura

Indi; Fire in Wholesale Shop; 20 lakhs of material burned-इंडी येथे होलसेल दुकानाला आग; २० लाखांचे साहित्य खाक 

Share

विजापूर जिल्ह्यातील इंडी येथील होलसेल स्टेशनरी दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. दरम्यान, काही हितशत्रूंनी ही आग लावल्याचा आरोप करून दुकानमालकाने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Indi; Fire in Wholesale Shop; 20 lakhs of material burned

विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरातील मध्यवर्ती भागातील महावीर सर्कलमधील प्रमोद ट्रेडर्स या होलसेल दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील साबण, शाम्पू, बिस्कीट,तंबाखू व अन्य साहित्य भस्मसात झाले. वीरेंद्र मांडरे यांच्या मालकीचे हे दुकान आहे.

आगीत दुकानातील सर्व किंमती साहित्य जळून खाक झाल्याने मांडरे यांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. काही उपद्रवी लोकांनी ही आग जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप दुकानमालक वीरेंद्र मांडरे यांनी केला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी इंडी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

 

Tags: