Belagavi

Environmental campaign for the protection of historic Krishnaghat;ऐतिहासिक कृष्णाघाट संरक्षणासाठी पर्यावरणपूरक मोहीम

Share

ऐतिहासिक कृष्णाघाट संरक्षणासाठी पर्यावरणपूरक मोहीम आखण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिकांनी बांधलेल्या या घाटाची पूरपरिस्थितीमुळे दुरवस्था झाली आहे. या घाटाच्या संरक्षणासाठी आता पर्यावरणप्रेमी पुढे सरसावले आहेत.

व्हॉइस : ऐतिहासिक वारसा असलेली कृष्णा नदी आपले पावित्र्य गमावत आहे. पूरपरिस्थितीमुळे या काठावर असलेल्या गावांना धास्ती लागून असते. याच ऐतिहासिक कृष्णाघाट संरक्षणासाठी पर्यावरणपूरक मोहीम आखण्यात आली आहे. उगार बुद्रुक या गावातील सरकारी, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, युवक, ज्येष्ठ नागरिक दररोज अंघोळीसाठी तसेच पोहण्यासाठी येतात. येथील जलप्रदूषण दूर करण्यासाठी बादशहा जमादार, प्रकाश डेरे, संजय शिंदे, मंदार कुलकर्णी, रमेश पाटील यासह अनेक पर्यावरण प्रेमींच्या नेतृत्वाखाली एक संघटना कार्यरत आहे. सुटीच्या दिवशी सकाळी ६ ते ७ या कालावधीत कृष्णाघाटची स्वच्छ मोहीम या संघटनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहे.

नदीच्या पाण्यात कपडे, निर्माल्य, अंत्यविधीनंतर करण्यात येणाऱ्या अंत्यक्रियेदरम्यान राहिलेले सर्व पूजेचे सामान, अस्थिविसर्जन हे कृष्ण नदी पात्रात नागरिकांकडून टाकण्यात येते. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित तर होताच आहे परंतु या नदीचे पावित्र्य देखील कमी होत चालले आहे. या नदीचेपावित्र्य राखण्यासाठी पर्यावरणप्रेमी जनजागृती करत आहेत.

सुमारे २०० वर्षांपूर्वी कृष्णानदीतीरावर ब्रिटिशांच्या राजवटीतील सांगली पटवर्धन संस्थानाने घाट बांधला होता. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे कृष्णाघाटची दुरवस्था होत आहे. या नदीतीरावरील घाटाची स्वच्छता, जपण्यासाठी आपण एक मोहीम सुरु केली असल्याची माहिती पर्यावरण प्रेमी संघटनेचे अध्यक्ष बादशहा जमादार यांनी दिली.

याचप्रमाणे प्रणेश कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले, गेल्या दीड वर्षांपासून घाटाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक रविवारी पर्यावरण प्रेमी, स्थानिक आमदार, साखर कारखान्यातील शिरगावकर बंधू आणि नगरपालिकेचे सदस्य या साऱ्यांच्या माध्यमातून हि स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे कुलकर्णी म्हणाले.

संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नामदेव खराडे, रमेश पाटील, मल्लारी पाटील, मुरलीधर केदार, प्रकाश डेरे, रमेश डोंगरे, तन्वीर नदाफ, इम्तियाज हुक्केरी, मंदार कुलकर्णी, चिंतामणी जोशी या साऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने कृष्णाघाटाची स्वच्छता मोहीम आखण्यात येत आहे. निसर्गाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत असून पर्यावरण प्रेमींनी आखलेल्या मोहिमेचे कौतुक करण्यात येत आहे.

Tags: