Belagavi

कलखांब येथे देवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन

Share

सर्वलोक फाउंडेशनच्या वतीने बेळगावजवळील कलखांब गावाबाहेर रस्त्याकडेला ठेवलेल्या देवदेवतांचे भग्न फोटो गोळा करण्यात आले.

होय, बेळगाव तालुक्यातील कलखांब गावच्या हद्दीत झाडांच्या कडेला आणि झाडाखाली पडलेले देव-देवतांचे फोटो आज सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांनी संग्रहित केले. फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या मोहिमेत भाग घेतला.

हिरेमठ यांनी संग्रहित केलेले फोटो आपल्या कारमधून नेऊन त्यांचे विधिपूर्वक विसर्जन केले. या मोहीमेत गुरुराज वाली, देवप्पा कांबळे, बाळू कणबरकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Tags: