Belagavi

Make a sincere effort to become a police officer : ADGP पोलीस होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत : एडीजीपी आलोक कुमार

Share

पोलिस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रामाणिक मार्गाने त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अवैध मार्गाने लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे असे आवाहन एडीजीपी अलोककुमार यांनी केले.

एडीजीपी अलोक कुमार यांनी शनिवारी बेळगावला भेट दिली. यावेळी शहर पोलीस मैदानावर आयोजित कार्यक्रमात एडीजीपी अलोककुमार यांनी शहर पोलिसांतर्फे पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली. संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना एडीजीपी अलोककुमार म्हणाले, समाजातील लोकांच्या जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आपण पुढे गेले पाहिजे. समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. बेळगाव आणि इतर काही शहरांत काही लहानमोठ्या अनुचित घटना घडत आहेत. या परिस्थितीत दूरदृष्टी ठेवून योग्य प्रतिबंधक उपाय करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. बेकायदा कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

मटका धंदा अनेक वर्षांपासून आव्हान बनला आहे. आता तो थोडा कमी झाला आहे, पण संपूर्णपणे संपलेला नाही. मी स्वतः बेळगावात अनेकवेळा धाडी टाकून कारवाई केली आहे. मटका, वाळूचे अवैध उत्खनन, मादक पदार्थांची चोरून विक्री अशा बेकायदा कृत्यांवर आळा घातला पाहिजे. शहरी अन ग्रामीण भागात गस्त घालण्याच्या वेगळ्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत. पोलिसांनी कर्तव्यदक्षतेने काम केल्यास समाजात शांतता नांदेल असे त्यांनी सांगितले.

पीएसआय भरती प्रकरणी झालेल्या घोटाळ्यावर भाष्य करताना एडीजीपी अलोककुमार म्हणाले, बेकायदा काम केल्यानं पोलिसांनी अटक केली आहे. केवळ पोलिसच नव्हे तर इतर नियुक्त्यांमध्येही घोटाळा झाल्याचे ऐकिवात आहे. मी सीसीबीत असताना एकदा पीएसआय भरतीत घोटाळा करण्याचा प्रयत्न काहींनी केला होता. मात्र मी त्यांना अटक करून त्यांचा डाव हाणून पडला होता. आपले लक्ष्य गाठण्यासाठी काहीजण गैरमार्गांचा अवलंब करतात. गैरमार्गाने कोणतेही लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कधी करू नये असे त्यांनी सांगितले. बाईट 

 

Tags: