एसएसएलसीनंतर व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणाऱ्या चिक्कोडीतील सरकारी प्रशिक्षक आणि प्रशिक्षण केंद्रात (GTTC) मध्ये प्रवेश देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीटीटीसी हुबळी विभागाचे प्रमुख डी. जी. मुगेरी यांनी सांगितले.

चिक्कोडी येथील जीटीटीसी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून आणि औद्योगिक संस्थांच्या विकासासाठी तांत्रिक व प्रशिक्षण सहाय्य देण्यासाठी कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका खात्याने चिक्कोडी येथे २०१८मध्ये महाविद्यालयाची स्थापना केली आहे. येथे दोन बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, तिसऱ्या बॅचसाठी प्रवेश सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
हे केंद्र चिक्कोडी शहरापासून दोन किमी अंतरावर आहे. रोजगारासाठी आवश्यक तंत्रज्ञान, संगणक, सीएनसी मशिन येथे उपलब्ध आहेत. प्रशिक्षणाचा दर्जाही उत्कृष्ट आहे. त्यामुळे येथे प्रशिक्षण घेतल्याने परदेशातही नोकरी मिळू शकते. या ठिकाणी डिप्लोमा इन टूल आणि डिप्लोमा इन डाय मेकिंग या दोन्ही कोर्सना प्रवेश सुरु झाले आहेत. १७ जून २०२२ ही प्रवेशाची अंतिम तारीख आहे असे त्यांनी सांगितले. बाईट यावेळी प्राचार्य शीतलकुमार देवलापुरे उपस्थित होते.


Recent Comments