खानापूर तालुक्यातील जांबोटी गावात एका चिकन सेंटरमध्ये विक्रीसाठी आणलेल्या तीन जिवंत पोपटांची वन विभागाच्या संचारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केल्याची घटना घडली.

जांबोटी गावातील चिकन सेंटरवर छापा मारून वन विभागाच्या पथकाने दुर्मिळ वन्यजीव प्रजाती-१ मध्ये येणारे लाल चोचींचे हिरव्या रंगाचे पोपट ताब्यात घेतले. याप्रकरणी अवैधपणे पोपट पकडून विकल्याच्या आरोपाखाली चिकन सेंटरचा मालक शौकत अली नाईक याला अटक करून स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. वनविभागाच्या संचारी पथकाच्या पीएसआय रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एस. आर. अरिबेंची, एम. ए. नायक, यू. आर. पट्टेद आणि के. बी. कंठी आदींनी या कारवाईत भाग घेतला.


Recent Comments