यूपीएससी परीक्षेत देशात २५०वा क्रमांक मिळविलेल्या बैलहोंगल येथील साहित्या मल्लिकार्जुन आलदकट्टी हिचा माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबासाहेब पाटील व रोहिणी पाटील या दांपत्याने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

होय, बैलहोंगल तालुक्यात सर्वप्रथम यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान साहित्या आलदकट्टी या युवतीने मिळवला आहे. या परीक्षेत तिने देशात २५० वा तर राज्यात १० वा क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल साहित्याचा अनेक संघ-संस्थांकडून सत्कार करून शुभेच्छा देण्यात येत आहेत. गुरुवारी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबासाहेब पाटील व रोहिणी पाटील या दांपत्याने साहित्याच्या घरी जाऊन तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. पारंपरिक पद्धतीने साडी, बांगड्या, फळे देऊन साहित्याचा ह्रुद्य सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्याच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून बोलताना साहित्याने सांगितले की, मी चारवेळा ही परीक्षा अनुत्तीर्ण झाले. पण कठोर मेहनत घेऊन पाचव्यावेळी उत्तीर्ण झाले. आता सगळे माझ्यावर प्रेम, अभिमान व्यक्त करत आहेत हे पाहून समाधान वाटत आहे.
या सत्कारामुळे माझी जबाबदारीही वाढली आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याची माझी इच्छा आहे. सेवाकाळात प्रत्येकाला आरोग्य, शिक्षण देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा मनोदय साहित्याने व्यक्त केला. बाईट त्यानंतर बोलताना माजी जिपं सदस्य रोहिणी पाटील म्हणाल्या, यूपीएससी परीक्षेत देशात २५० वा क्रमांक मिळवून साहित्याने कित्तूर आणि बैलहोंगलचे नाव देशात उज्वल केले आहे. भविष्यात तिने बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावावी अशी आमची इच्छा आहे.
साहित्याच्या यशाने या भागातील एकही युवक-युवतींना प्रेरणा मिळून त्यांनीही यूपीएससी परीक्षेत असेच यश मिळवावे अशी अपेक्षा रोहिणी पाटील यांनी व्यक्त केली. बाईट यावेळी पशुवैद्याधिकारी डॉ. उमेश होसूर, कृष्णाजी कुलकर्णी, बसवराज सुतगट्टी, श्रीशैल आलदकट्टी, मल्लिकार्जुन इनामदार, सिद्दनगौडा पाटील, रवी पाटील, अस्मिता पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. एकंदर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही कठोर मेहनत घेऊन अभ्यास केल्यास त्यांनाही यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे अवघड नाही हेच साहित्याने सिद्ध केले आहे. तिच्या यशामुळे इतर युवक-युवतींनाही अशीच कामगिरी करण्याची प्रेरणा मिळो हीच सगळ्यांची अपेक्षा आहे.


Recent Comments