रासायनिक खतांच्या वापरामुळे मातीची गुणवत्ता कमी होत असून यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेणे शक्य होत नाही. यासंदर्भात आज २०० हुन अधिक विद्यार्थिनींनी यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केली आहे.

मातीच्या संरक्षणासाठी सुरु असलेल्या अभियानाला विजापूरमधून देखील पाठिंबा व्यक्त करण्यात आला असून विजापूर शहरातील सरकारी विद्यार्थिनीच्या शाळेतील विद्यार्थिनींनी पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केली आहे. रासायनिक खतांचा वापर हल्ली मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे मी मातीची गुणवत्ता कमी होत चालल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी शेती उत्पादनाला याचा फटका बसत असून रासायनिक खतांचा वापर बंद करून माती वाचविण्यासाठी इशा फाउंडेशनच्या वतीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती विजापूर कृषी विभागाचे अधिकारी बसवराज यांनी दिली. 
इशा फाउंडेशनच्या वतीने शहरातील सरकारी महिला कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्रार्थनेवेळी विद्यार्थिनींना सदर बाब पटवून देऊन जनजागृती करण्यात आली. यानंतर २०० हुन अधिक विद्यार्थिनींनी या अभियानात सहभाग घेऊन पंतप्रधानांना पत्र लिहून मातीच्या संरक्षणासाठी नवा कायदा जारी करण्याची विनंती करण्यात आली. ()
मातीच्या संरक्षणासाठी जागृती करण्यासाठी देशभरात अभियान हाती घेण्यात आले असून विजापूरमधील सरकारी शाळेतील विद्यार्थिनीदेखील या अभियानात सहभागी झाल्या आहेत. थेट पंतप्रधानांनाच हि पत्रे पाठविण्यात येत असून आता यासंदर्भात कोणता निर्णय घेण्यात येईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Recent Comments