लग्नासाठी कोणी मुलगी देणार नाही या कारणावरून शेतकरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हुक्केरी तालुक्यातील करगुप्पी यल्लापूर येथे घडली आहे.

होय, रमेश बाळप्पा पाटील या २५ वर्षीय शेतकरी युवकाने आपल्याला लग्नासाठी कोणी मुलगी देणार नाही या विवंचनेतून शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना हुक्केरी तालुक्यातील करगुप्पी यल्लापूर येथे घडली. रमेशच्या २ मोठ्या भावांसाठी वंदू संशोधन सुरु होते. पण अनेक स्थळांकडून नकार आल्याने त्यांचे लग्न होत नव्हते. याबाबतची घरात झालेली चर्चा रमेशने ऐकली होती. त्यामुळे आपणालाही लग्नासाठी कोणी मुलगी देणार नाहीत अशी समजूत त्याने करून घेतली होती. त्यातूनच त्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पाच्छापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
आपल्या मुलीचे कल्याण व्हावे या भावनेने सरकारी नोकरीवाल्या वरालाच मुलगी देण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार वरांना वधू मिळणे कठीण झाले आहे. त्यातून असे प्रसंग घडत आहेत ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.


Recent Comments