Belagavi

Server down at Belgaum RTO office : बेळगाव आरटीओ कार्यालयात सर्व्हर डाऊन

Share

बेळगावमधील आरटीओ कार्यालयात सर्व्हर डाउनच्या समस्येमुळे जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत कोणतेही अधिकारी जबाबदारीने वागत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

बेळगावच्या आरटीओ कार्यालयात गेल्या १५ दिवसांपासून सर्व्हर डाऊन समस्या उद्भवली आहे. याठिकाणी कोणी कर्मचारीही उपलब्ध नसून अधिकाऱ्यांकडून सर्व्हरचे कारण सांगण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत असून आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात आणि येथील व्यवस्थापनासंदर्भात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

आरटीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या एका नागरिकाने आपली मराठीला प्रतिक्रिया देताना सांगितले, कि गेल्या १५ दिवसांपासून आरटीओ कार्यालयात सर्व्हर डाऊनचे कारण देण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी ७०० फाईल्स अजूनही रेंगाळत आहेत. आपले कामकाज पूर्ण न होत असल्याने नागरिक आरटीओ कार्यालयाविरोधात जोरदार संताप व्यक्त करत आहेत. या समस्येवर तातडीने उपाय शोधावा असे आवाहन नागरिक करत आहेत.

यावेळी ऑटोरिक्षा असोसिएशनच्या सदस्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, ऑटो रिक्षा नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात सातत्याने चक्कर मारावी लागत आहे. येथे ना अधिकारी उपस्थित आहेत ना कर्मचारी. आणि जे अधिकारी उपस्थित आहेत त्यांच्याकडून सर्व्हर डाऊनची कारणे ऐकवण्यात येत आहेत. बाहेर पोलिसांकडून कागदपत्रांची होत असलेली चौकशी आणि कागदपत्रांसाठी १५ दिवसांहून अधिक काळ आरटीओ कार्यालयात ताटकळावे लागत असून आता आपली समस्या कोण सोडविणार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. ()

सर्व्हर डाउनच्या या समस्येमुळे आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची प्रचंड तारांबळ उडत असून १५ दिवसांपासून तारीख पे तारीख कारणे ऐकून आता नागरिक मात्र वैतागले आहेत.

Tags: