यमकनमर्डी मतदार संघाचे सतीश जारकीहोळी हे आगामी काळात कल्याण कर्नाटकचे मुख्यमंत्री व्हावेत, असे मत यमकनमर्डी मतदार संघाचे काँग्रेस नेते जंगलीसाब नाईक यांनी व्यक्त केले.

आमदार सतीश जारकीहोळी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने त्यांचे समर्थक फजल मकानदार यांच्या नेतृत्वाखाली संघाने हुक्केरी सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळ, दूध आणि ब्रेडचे वाटप केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जंगलीसाब नाईक म्हणाले, यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या जन्मदिनानिमित्त सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळ, दूध आणि ब्रेडचे वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त फटाके उडवून औषध वितरण तसेच केक कापून कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. विविध रुग्णांकडून त्यांच्या जन्मदिनी त्यांना अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळाले आहेत. सतीश जारकीहोळी यांनी आगामी काळात कल्याण कर्नाटकचे मुख्यमंत्री बनावे, अशा शुभेच्छा आपण देत असल्याचे जंगलीसाब नाईक म्हणाले, 
हुक्केरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उदय कुडची यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, आमदार सतीश जारकीहोळी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळ, दूध आणि ब्रेड चे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आपण शुभेच्छा देत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मुख्य वैद्याधिकारी महांतेश नरसन्नवर, नेते फजल मकानदार, टी डी चिक्कप्पगोळ, जंगलीसाब नाईक, राजू जक्कप्पगोळ, मस्तान मुजावर, सरफराज पिरजादे, अमर उमानाबादीमठ, विनोद उमानाबादीमठ, बाबुराव देसाई, गुरुसिद्द पाटील, नूर मुल्ला, मोदीन मुदिहळ्ळी, विलास कोले, बसवराज बडकुंद्री आदी उपस्थित होते.


Recent Comments