चिक्कोडी तालुक्यातील अनेक गावांना काल सायंकाळी जोरदार पावसाने सुमारे तासभर झोडपून काढले. त्यामुळे अंकली, मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी आदी गावातील अनेक घरांचे छप्पर उडून गेले.

होय, चिक्कोडी तालुक्यातील अनेक गावांना काल, बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने सुमारे तासभर झोडपून काढले. मुसळधार पावसाने अक्षरशः बराच काळ थैमान घातले. जोरदार वाऱ्यासह चांगलाच पाऊस झाला. त्यामुळे अंकली, मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी आदी गावातील अनेक घरांचे पत्र्यांचे छप्पर उडून गेले. परिणामी अनेकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
इंगळी गावातील उदय शास्त्री आणि रावसाहेब शास्त्री यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर उडून गेले. उडून पडलेला पत्र लागल्याने प्रतिभा शास्त्री यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना त्वरित इस्पितळात नेऊन उपचार करण्यात आले. मांजरी गावात काल सायंकाळचा बाजार भरला होता. परंतु जोरदार पावसामुळे अनेक विक्रेत्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले.


Recent Comments