अंगावर वीज कोसळल्याने बैल जागीच गतप्राण झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाडजवळील खानिकेरी गावात घडली.

खानिकेरी गावातील गदेप्पा बसनगौडा पाटील यांच्या मालकीच्या बैलाचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. मुद्देबिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. सुमारे ८० हजार रुपये किमतीचा हा बैल होता. त्यामुळे गदेप्पा पाटील यांना मोठा आर्थिक फटका तसेच मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे सरकारने आपल्याला योग्य भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


Recent Comments