Bidar

Bidar Basavakalyan Manthap : बिदरमधील पिरपाशा दर्ग्यातही अनुभव मंडपसदृश्य चिन्हे

Share

बीदर जिल्ह्यातील बसवकल्याणमधील पीर पाशा दर्ग्याची सद्या बरीच चर्चा होत आहे. येथील मशिदीचे हिंदू मंदिराच्या वास्तूंशी बरेच साम्य असून, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

होय, गेल्या काही दिवसांपासून बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथील पीर पाशा दर्गा असलेल्या जागेत १२व्या शतकात बांधलेला अनुभव मंडप होता अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. मात्र असा दावा करण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे साक्षी-पुरावे नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, या मशिदीच्या अंतर्भागाचा व्हिडिओ कोणीतरी काढला असून तो आता समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या मशिदीच्या जागेत पूर्वी मंदिर असल्याचे दर्शविणारे काही बांधकाम सापडले आहे. त्यामुळे येथे आधी मंदिरच होते असा दावा काहीजण करत आहेत. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. येथील दगडी भिंतींची रचना मंदिराच्या भिंतीप्रमाणेच आहे. पूर्वीच्या मंदिरात असते तसे दरवाजे आणि एक विहिर देखील येथे आहे. मशिदीत आत जाऊ हा विडिओ चित्रित करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

 

Tags: