Belagavi

The eighth anniversary of Vitthal-Rukmini temple in Kadoli :कडोलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा आठवा वर्धापन दिन उत्साहात

Share

कडोली येथील पेठ गल्लीतील नूतन विठ्ठलरुक्मिणी मंदिराचा आठवा वर्धापन दिन श्री कल्मेश्वर वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ कडोली यांच्यातर्फे नुकताच पारंपारिक धार्मिक भक्तीमय वातावरणात पार पडला.

यानिमित्त पहाटे काकड आरती, देवाला अभिषेक, भजन, हरिपाठ, महिला भजन, प्रवचन व संगीत भजन असे धार्मिक कार्यक्रम दिवसभर झाले. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. यावेळी भाविकांना प्रसादवाटप करण्यात आले.

यावेळी खानापुर तालुक्यातील किरहलशी गावचे प्रसिद्ध युवा कीर्तनकार डॉ. ह.भ.प.विठ्ठल पाटील यांनी अत्यंत धर्म, अर्थ, काम व क्रोध आणि संस्कार यावर अत्यंत प्रभाविपणाने कीर्तनातून प्रबोधन केले. त्यानंतर कंग्राळी खुर्द भजन मंडळातर्फे संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.

वर्धापन दिनानिमित्त मंदिरासह परिसराची स्वच्छता करून विद्युत अलंकाराने मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

 

 

Tags: