बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील संकोनट्टी गावात इंचगेरी संप्रदायाचा सप्ताहाची तयारी उत्साहात सुरु आहे.

कोरोनामुळे गेली २ वर्षे सगळ्याच सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. आता कोरोनाचे संकट टळले असल्याने सण-उत्सव, धार्मिक उपक्रमांना नेहमीप्रमाणे प्रारंभ झाला आहे. अथणी तालुक्यातील संकोनट्टी गावात इंचगेरी संप्रदायाचा सप्ताह उत्साहात सुरु आहे. भक्तांनी मोठ्या उत्साहात त्यामध्ये भाग घेतला आहे.
सप्ताहानिमित्त भाविकांना आंब्याचे शिकरण, गुळापासून बनवलेल्या खास पोळ्या प्रसाद स्वरूपात देण्यात येत आहेत. मठातील भक्त व इतर असे मिळून १५०० जणांना पुरेल एवढे आंब्याचे शिकरण आणि पोळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळपासूनच महिला मठात येऊन पोळ्याची तयारी करत आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली. 
आंब्याच्या शिकरणासाठी लागणारे आंबे खास शेजारील महाराष्ट्रातील सांगली, बेळगाव, विजापूर येथून आणण्यात आले आहेत. आज मंगळवारी रात्री सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. रात्री खास आंब्यांच्या शिकरणाचे भोजन भक्तांना देण्यात येणार आहे. १०८ सुवासनी जलकुंभ मिरवणूक काढणार आहेत. यानिमित्त दिंडी पालखी सोहळा तसेच स्वागताचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.
सप्ताह सोहळ्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.


Recent Comments