Belagavi

Beware of diseases caused by mosquitoes in the rainy season Dr. Palleda पावसाळ्यात डासांमुळे उद्भवणाऱ्या रोगांपासून सावधगिरी बाळगा,डॉ. पल्लेद

Share

मलेरिया निर्मूलनाच्या आतापर्यंतच्या १३ जिल्ह्यांमध्ये बेळगाव प्रथम क्रमांकावर आहे. मलेरिया निर्मूलनाचे ध्येय गाठण्याच्या जवळ आपण असून २०२५ पर्यंत संपूर्ण मलेरिया निर्मूलन होईल, असा विश्वास जिल्हा रोग नियंत्रणाधिकारी डॉ. पल्लेद यांनी व्यक्त केलाय.

बेळगाव पत्रकार भवन येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१७ पासून मलेरियाचे प्रमाण कमी होत चालले असून मागील १० केसीसचे अहवाल आले आहेत. या वर्षात केवळ २ रुग्ण आढळून आले असून गेल्या पाच वर्षातील रुग्णांची आकारडेवारी पाहता २५ वरून हि संख्या आता २ वर आली असल्याचे डॉ. पल्लेद म्हणाले. ज्याप्रकारे कोविड काळात आपण खबरदारी घेतली त्याचप्रमाणे मलेरिया साठीही खबरदारी घेऊन गोवा, महाराष्ट्रातून येणाऱ्या संबंधित रुग्णांची माहिती मिळताच तातडीने आपल्याला माहिती देण्यात यावी, यासाठी रक्त तपासणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ. पल्लेद म्हणाले.

बायोलॉजिकल कंट्रोल संदर्भात बोलताना डॉ. पल्लेद म्हणाले, बायोलॉजिकल नियंत्रणासाठी मासे सोडण्यात येत आहेत. आपल्या जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये मासेमारी करण्याचे आमचे ध्येय आहे२५०० विहिरी आणि तलावांमध्ये मासे सोडण्यात आले असून हे मासे डासांच्या आल्या खातात. यामुळे जैविक नियंत्रण राखण्यास मदत होते, केमिकलपेक्षा हि पद्धत चांगली असल्याचे डॉ. पल्लेद म्हणाले.

दरवर्षी ७ लाख रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. कोविडमुळे गेल्या वर्षात ४ लाख रक्त तपासण्या झाल्या आहेत. मे मणिन्यापर्यंत ३ लाख २० हजार रक्त तपासण्या झाल्या असून लोकसंख्येपैकी शेकडा १ टक्के रक्ततपासणी होणे गरजेचे आहे असे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारने दिले असून यानुसार रक्ततपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ()

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांपासून बचाव करण्यासाठी, ज्यांच्या घरात पाणी साचले आहे अशा ठिकाणी मत्स्यपालन विभागाच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या पावसाळी हंगाम सुरु होत असून या वेळेत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, चार ते पाच वेळा पाण्याची भांडी घासून पाणी भरावे, या पाण्यात डास जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना डॉ. पल्लेद यांनी दिल्या आहेत. डासांच्या अंड्यांमुळे अनेक प्रकारचे रोग निर्माण होऊ शकतात, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

टीएफ मलेरिया प्रकरणात ३० टक्क्यांइतका मृत्युदर आहे. याचप्रमाणे देणगीमध्ये २५ टक्के मृत्युदर आहे. यामुळे ज्यांच्या घरात पाणी साचते अशांनी याची अधिक खबरदारी घ्यावी, आपल्या घरातील तसेच घराबाहेरील परिसर स्वच्छ ठेवावा असे डॉ. पल्लेद म्हणाले. आतापर्यंत दिन्ग्यूसाठी २०६ जणांचे अहवाल घेण्यात आले असून यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिकुन गुनियामध्ये ४६ अहवालांपैकी ३ जण पॉझिटिव्ह आले असल्याचे डॉ. पल्लेद यांनी सांगितले.

Tags: