Belagavi

3 PEOPLE SERIOUSLY INJURED IN SWORD ATTACK IN BELGAUM CAMP; बेळगावातील कँपमध्ये तिघांवर तलवारीने हल्ला; संपत्तीच्या वादातून घटना

Share

 संपत्तीच्या वादातून तलवारीने हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केल्याची घटना बेळगावातील कँप परिसरामध्ये घडली आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी जाळे विणले आहे.

होय,काळ सोमवारी सायंकाळी बेळगावातील कॅंप परिसरात थरारक घटना घडली. खानापूर रस्त्यावरील दोन कुटुंबात संपत्तीच्या वादातून झालेल्या भांडणात तलवारीने वर करून तिघांना गंभीर जखमी करण्यात आले. लोहार कुटुंबातील या भांडणाचे पर्यावसान हिंसक झडपेत झाले. यावेळी संतोष लोहार, पवन लोहार आणि इतरांनी विनायक लोहार, राजू लोहार आणि रॉकी फ्रान्सिस यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात ते तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपींची घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कॅंप पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली. जखमींना जिल्हा सरकारी इस्पितळात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत प्रसारमाध्यमं माहिती देताना एका जखमींच्या पत्नीने सांगितले की, माझे पती भांडण सोडविण्यास गेले असता, त्यांच्यावर पाठीमागून तलवारीने हल्ला करण्यात आला. माझ्या नणंदेच्या पतीचे हे भांडण होते. त्यामुळे ते सोडवायला गेलेल्या माझ्या पतीवर पाठीमागून तलवारीने हल्ला करण्यात आला. माझे पती या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. हल्लेखोर घटनेनंतर घरातून फरारी झाले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक करण्याची ग्वाही दिली आहे. आम्हाला या प्रकरणी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संबंधित महिलेने केली .

दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. कॅंप पोलिसांनी खुनी हल्ल्याचा गुन्हा नोंदवून हल्लेखोरांच्या अटकेसाठी जाळे विणले आहे.

 

 

 

 

Tags: