राष्ट्रकवी कुवेंपु यांच्या संदर्भात पाठयपुस्तक पुनर्र्चना समितीत कार्यरत असणारे रोहित चक्रतीर्थ यांनी अवमानकारक वक्तव्य केले असून या प्रकाराविरोधात बेळगावमध्ये कर्नाटक रक्षण वेदिकेने आंदोलन छेदत निषेध व्यक्त केला.
राणी चन्नम्मा चौकात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत निषेध मोर्चा काढला. कुवेंपुंसंदर्भात निंदी कृत्य करणाऱ्या रोहित चक्रतीर्थ यांना पाठयपुस्तक पुनरावलोकन समितीतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी करत रोहित चक्रतीर्थ यांची प्रतीकात्मक प्रतिकृती धन केली.
यावेळी सरकार विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राणी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या निषेध मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सत्ताधारी सरकार गुलामगिरीची नीती अवलंबत असल्याचे सांगत भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. 
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी बोलताना म्हणाले, कन्नड विरोधी आणि कुवेंपुंचा अवमान करणाऱ्या व्यक्तीची पाठ्यपुस्तक समितीत निवड करण्यात आली आहे. याचा कर्नाटक रक्षण वेदिका निषेध करत असून या मंडळातून कन्नड विरोधकांना तात्काळ वगळण्यात यावे, अन्यथा अशी पाठ्यपुस्तके वाचून मुलांमध्ये द्वेषाचे बीज पेरले जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
याचप्रमाणे आणखी एका आंदोलनकर्त्याने प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले कि, रोहित चक्रतीर्थ यांनी कन्नड ध्वज आणि राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे. पाठ्यपुस्तक समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून सरकारने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. विविधतेत एकटा साधणाऱ्या देशात सरकार एकाच समाजाला पाठिंबा अधिक देत असून हि गुलामगिरीची धोरणे सरकार अवलंबत असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्याने केलाय.
रोहित चक्रतीर्थ यांच्याविरोधात राज्यभरात अनेक संघटना आंदोलने करत आहेत. पाठयपुस्तक समितीतून त्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी करत बेळगावमध्ये आज आंदोलन झाले आहे. आता सरकार या आंदोलनांची दखल कशापद्धतीने घेईल, हे पाहणे महत्वाचे आहे.


Recent Comments