Belagavi

Ramdevagalli mosque-temple issue; MLA Abhay Patil’s discussion with dc :रामदेव गल्लीतील मशीद-मंदिराचा मुद्दा : आ. अभय पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

Share

बेळगावमधील रामदेव गल्ली येथे मंदिर पाडून मशीद बांधण्यात आल्याचा आरोप केलेल्या बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.

होय, सोमवारी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी रामदेव गल्ली येथील मशिदीबाबत चर्चा केली. बेळगावातील रामदेवगल्ली येथील मशीद ही आधी हिंदू मंदिर होते. त्यांची बाहेरून तपासणीही करण्यात आली आहे. तुम्हीही स्वतः त्याची तपासणी करा अशी सूचना आ. अभय पाटील यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना यावेळी केली.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रसार माध्यमांना माहिती देताना आ. अभय पाटील म्हणाले, रामदेव गल्लीतील मंदिर पाडून मशीद बांधल्याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. याबाबत कागदपत्रेही जमा करण्यात आली असून, ती तहसीलदार आणि पुरातत्व खात्याच्या निदर्शनास आणून द्यावीत अशी मागणी केली आहे.   एकंदर जिल्हाधिकाऱ्यांनी रामदेव गल्लीतील मंदिराच्या जागेची पाहणी करावी, अशी सूचना आमदार अभय पाटील यांनी केली आहे.

 

 

Tags: