आरएसएस ही नपुंसकांची संघटना असल्याची टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज टीका केली. भरकटलेल्या काँग्रेस नेत्यांना देव सद्बुद्धी देवो असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर हलक्या शब्दांत टीका करणाऱ्या, त्यांना नपुंसक म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर आ. अभय पाटील यांनी आज जोरदार टीका केली. काँग्रेसवाल्यांना अक्कल नाही, सामान्य ज्ञान नाही. असे शब्द आम्हालाही वापरता येतात हे त्यांनी लक्षात घ्यावे. भरकटलेल्या काँग्रेस नेत्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो असे आ. पाटील म्हणाले. बाईट रा. स्व. संघामुळेच देश आज सुरक्षित आहे.
देश तोडणाऱ्यांना हे सत्य पचविणे जड जात आहे. राहुल गांधी नुकतेच अमेरिकेतील खासदारांना भेटून आले आहेत. त्यामुळे त्यांना देशविरोधी म्हटले तर काय चुकले? असा सवाल आ. अभय पाटील यांनी केला. बाईट त्यांच्याकडे बोलायला दुसरा मुद्दा नाही. सरकारच्या कारभाराबाबत प्रश्न करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. त्यामुळे उगाचच संघाविरोधात टीका करत, काहीही बोलत सुटले आहेत असे आ. अभय पाटील यांनी सांगितले.


Recent Comments