BJP campaigning in Hukkeri 2022: हुक्केरी आणि यमकनमर्डी विभागाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी येथे भारतीय जनता पक्षाची प्रचार सभा पार पडली.

हुक्केरी येथील विश्वराज भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत जिल्हा पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते वृक्षाला पाणी घालून या सभेची सुरुवात करण्यात आली.
पदवीधर शिक्षक निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार हनुमन्त निरानि आणि शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक लढवीत असलेले अरुण शहापूर यांच्या विजयासाठी अनेक मान्यवरांनी मतयाचना केली. यावेळी व्यासपीठावर आहार आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार दुर्योधन ऐहोळे, महादेव यादवाड, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी मंत्री शशिकांत नाईक, उज्वला बडवानाचे, चिकोडी जिल्हा भाजपाध्यक्ष राजेश नेर्ली आदी उपस्थित होते. 
यावेळी हुक्केरी आणि यमकनमर्डी भाजप नेते सत्तेप्पा नायक, गुरुराज कुलकर्णी, नगरपालिका अध्यक्ष अण्णाप्पा पाटील, रवी हंजी, मारुती अष्टगी, रचयय हिरेमठ, पदवीधर आणि शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments