Belagavi

ग्रामीण प्रतिभा राष्ट्रीय स्तरावर चमकल्याचा अभिमान : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बेळगावची ग्रामीण प्रतिभा राष्ट्रीय स्तरावर चमकत असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे असे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगाव येथील सरस्वती नगर पाइपलाइन रोड येथे कम्प्लीट कराटे अकादमी, कर्नाटक आणि जिल्हा क्रीडा संघटनेच्या वतीने, कोप्पळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत विजेत्या खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी खेळाडूंना ट्रॅक सूट प्रदान केले.

त्यानंतर बोलताना आ. हेब्बाळकर म्हणाल्या, आज आम्हाला अभिमान वाटतो की, बेळगावच्या ग्रामीण भागातील कराटेपटूंनी राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. या कराटेपटूंना प्रशिक्षण देणाऱ्या कराटे मास्टर जितेंद्र यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.

या नंतर आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना अकादमीतर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर, ग्रापं सदस्य मोहन सांबरेकर, जैनुद्दीन मुजावर, डॉ.अजित जडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Tags: