Belagavi

बेळगावात उद्या श्रमिक पत्रकार संघाची कार्यशाळा

Share

कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे उद्या रविवारी ‘प्रसारमाध्यमे आणि कायदा’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. केएलई संस्थेच्या जेएनएमसी जिरगे हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेची तयारी जोरात सुरु असून, आज पूर्वतयारीची सभा घेण्यात आली. बेळगावातील नेहरूनगर येथील केएलई संस्थेच्या जेएनएमसी जिरगे हॉलमध्ये उद्या सकाळी १०.३० वाजता ३ वर्षातील घडामोडी आणि माध्यमे व कायदा या विषयावर कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

या कार्यशाळेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज सभा घेण्यात आली. हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महस्वामीजींच्या सानिध्यात ही कार्यशाळा होणार आहे. कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ कार्यशाळेचे उदघाटन करतील. यावेळी उमा महेश वैद्य लिखित ‘माध्यमांनो, या कायद्याची जाणीव असू द्या’ या पुस्तकाचे प्रकाशन कायदा मंत्री जे. सी. माधुस्वामी तसेच वाटचालीच्या माहितीच्या लघु पुस्तिकेचे प्रकाशन उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांच्याहस्ते करण्यात येईल. यावेळी आ. अभय पाटील, अनिलबॅंके, संघाच्या जिल्हा शाखेचे गौरवाध्यक्ष भीमशी जारकीहोळी, राष्ट्रीय श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. व्ही. मल्लिकार्जुनय्या, पत्रकार एच. बी. मदनगौडर, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, लेखिका उमा महेश वैद्य उपस्थित राहणार आहेत.

संघाचे राज्य सरचिटणीस जी. सी. लोकेश, उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, अज्जमड रमेश कुटप्पा, भवानीसिंग एम. ठाकूर, सचिव मत्तिकेरे जयराम, सोमशेखर इरगौडा आणि निंगाप्पा चावडी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी दिलीप कुरुंदवाडे यांचे बीजभाषण होईल.

दुपारी 2.30 वाजता ‘बदलते कायदे आणि प्रसारमाध्यमे’ तसेच ‘आरोग्यासाठी संगीत’ या विषयावर महेश वैद्य आणि डॉ. संतोष बोराडे यांची व्याख्याने होणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी जिल्हा कार्यकारिणीला आवश्यक सूचना केल्या. या सभेला संघाचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, जिल्हा उपाध्यक्ष राजशेखर पाटील आदी उपस्थित होते.

Tags: