Belagavi

बेळगावमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

Share

बेळगाव शहरातील जे एन एम सी परिसरात असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण तलावात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या जलतरण स्पर्धांना बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

स्वीमर्स क्लब असोसिएशन, कर्नाटक स्विमिंग असोसिएशन, बेळगाव के एल इ विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील जे एन एम सी परिसरात असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण तलावात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या जलतरण स्पर्धांना बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ज्युनियर, सब ज्युनियर चॅम्पियनशिप २०२२-२३ या या जलतरण स्पर्धांना जलतरण पटूंनी उत्तम प्रतिसाद देत मोठ्या उत्साहात सहभाग दर्शविला आहे.

या स्पर्धेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना जलतरण प्रेमींनी सांगितले, पोहणे हा एक उत्तम व्यायाम आहे. पोहण्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना उत्तम व्यायाम मिळतो. टीव्ही आणि मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना अशा प्रकारच्या व्यायामात गुंतवून ठेवणे गरजेचे आहे.यामुळे त्यांना उत्तम व्यायाम मिळेल. अशा स्पर्धांमुळे त्यांना उच्च स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन मिळेल.

याचप्रमाणे आणखी एका जलतरण प्रेमाने प्रतिक्रिया देताना सांगितले कि, बेळगावमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत ६०० हुन अधिक जलतरणपटू सहभागी झाले आहेत. हा जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय पातळीवरील असून गेल्या ३० वर्षांपासून आपण जलतरण सराव करत आहोत. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे अनेक जलतरण पटुंना प्रोत्साहन मिळाले असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बेळगावमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत बेळगाव आणि परिसरातून अनेक जलतरण पटूनि सहभाग घेतला होता. याचप्रमाणे जलतरण प्रेमींनीही हि स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Tags: