Hukkeri

बसवकल्याणमधील पीर पाशा बंगला हा अनुभव मंडपच : चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींचा दावा

Share

बसव कल्याण येथील पीर पाशा बंगला विश्वगुरू बसवण्णा यांनी स्थापन केलेला मूळ अनुभव मंडप आहे असा दावा हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी केला आहे.

बसवकल्याण येथील मूळ अनुभव मंडपाची देशभरात चर्चा सुरु आहे. याबाबत हुक्केरी येथे पत्रकारांशी बोलताना हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले, बसव कल्याण येथील पीर पाशा बंगला विश्वगुरू बसवण्णा यांनी स्थापन केलेला मूळ अनुभव मंडप आहे. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करून मुस्लिम बांधवांशी सौहार्दाने चर्चा करून मूळ अनुभव मंडपाचा विकास केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी वीरशैव लिंगायत संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप कंकणवाडी म्हणाले, जगातील पहिली संसद आमचा अनुभव मंडप निजामांनी बळकावला, आता तो नबाबाच्या ताब्यात आहे हे आमचे दुर्दैव आहे. मुख्यमंत्र्यांनी हा पीर पाशा बंगला तातडीने ताब्यात घ्यावा आणि त्याचे स्मारकात रूपांतर करावे. या मागणीसाठी १२ जूनला मठाधीश, स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

 एकंदर आता मशीद, मंदिर, वास्तूंवरून हिंदू-मुस्लिमांत अनेक वाद उफाळून येऊ लागले आहेत. तशातच अनुभव मंडपाचा वादही नव्याने उफाळून आला आहे. यावर सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पहावे लागेल.

 

Tags: