Belagavi

बेळगावात राज्यस्तरीय स्विमिंग चॅम्पिअनशिपचा समारोप

Share

बेळगावात आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर आणि ज्युनियर स्विमिंग चॅम्पिअनशिप 2022-23 उत्साहात पार पडली. स्पर्धेतील विविध विभागातील विजेत्या जलतरणपटूंना समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

होय, बेळगावात केएलई संस्थेच्या सहयोगाने जेएनएमसी सुवर्ण जलतरण तलावात स्विमर्स क्लब व ऍक्वेरियस क्लबने आयोजित केलेल्या २ दिवसीय राज्यस्तरीय सब ज्युनियर आणि ज्युनियर स्विमिंग चॅम्पिअनशिप 2022-23 चा समारोप करण्यात आला. या स्पर्धेतील विविध विभागातील विजेत्या जलतरणपटूंना समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत पुरुषांच्या गटात 800 पवन धनंजयने प्रथम, अमोघ आनंद व्यंकटेश द्वितीय, धोनीश एन.ने तिसरा क्रमांक पटकावला.

महिला गटात शिरीनने प्रथम, आदिती एन. मुलाईने द्वितीय तर रितिका बी.एम.ने तृतीय क्रमांक पटकावला.

त्याचप्रमाणे 4X200 मीटर फ्री स्टाईल, 200 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर बीन्स स्ट्रोक, 50 मीटर बॅक स्ट्रोक    तसेच 100 मीटर आणि 200 मीटर बटरफ्लाय प्रकारातील पुरुष आणि महिलागतातील विजेत्या जलतरणपटूंना पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कर्नाटक जलतरण संघटनेचे अध्यक्ष गोपाल होसूर, उपाध्यक्ष टी.जी.विजयराघवन, एस. आर. शिंदे, रक्षित जगदाळे, मानद सचिव सतीशकुमार, त्रिविक्रम निकम, सहसचिव एम. पी. नाभिराज, रम्या बालकृष्ण आदी उपस्थित होते.

 

 

Tags: