बेळगावमधील माजी नगरसेवक संजय सुंठकर निर्मित ‘तीन शाने’ हा पहिला वहिला बॉलिवूड चित्रपट आज देशभरासह बेळगावात देखील प्रदर्शित झालाय.

शुक्रवारी बेळगाव मनपाचे माजी नगरसेवक संजय सुंठकर निर्मित ‘तीन शाने’ चित्रपटाचे भव्य प्रदर्शन आज देशभरात करण्यात आले. बेळगावमध्ये या चित्रपटाचा पहिला शो प्रदर्शित करताना आमदार अनिल बेनके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, बसवराज रायगोळ, निर्माते संजय सुंठकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वनाने चित्रपट प्रदर्शनाची सुरुवात झाली.
मान्यवर आणि रसिकांनी तीन शाने या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो मोठ्या उत्स्फूर्तपणे पाहिला. प्रकाश चित्रपटगृहात या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
यावेळी इन न्यूज शी संवाद साधताना आमदार अनिल बेनके यांनी या चित्रपटाचे कौतुक केले. बेळगावमधील संजय सुंठकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे मिळाला असून हा चित्रपट २५० हुन अधिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हि बेळगावसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.
चित्रपटाचे निर्माते संजय सुंठकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, श्री सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने आपण बॉलिवूड मधील या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हि बेळगाव आणि कणबर्गी वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन अवश्य पाहावा, असे आवाहन त्यांनी केले. 
यावेळी श्रीरामसेन हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनीही संजय सुंठकर यांनी केलेल्या या प्रयत्नाचे कौतुक केले. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात नेहमी सक्रिय असणाऱ्या सुंठकर यांनी आणखी एका क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले असून हि बेळगाववासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
बेळगावसह देशभरात अनेक चित्रपट गृहात प्रदर्शित झालेल्या तीन शाने या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.


Recent Comments