बेळगावात बबन भोबे मित्रमंडळातर्फे दानशूरांच्या मदतीने शाळांमधील गरीब मुलांना दफ्तर, जेवणाचा डबा आदी शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

होय, बेळगावात गोंधळी गल्लीतील दत्त मंदिरासमोर झालेल्या कार्यक्रमात बबन भोबे मित्रमंडळातर्फे दानशूरांच्या मदतीने शाळांमधील गरीब मुलांना दफ्तर,जेवणाचा डबा आदी शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
वह्या, पेन, दफ्तर,जेवणाचा डबा आदी शालेय साहित्याचे यावेळी ऍड, एस. जी. भावीमनी यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी शंकर पावशे, बबन भोबे, मंदा नेवगी, सुरेश शिंदे, संतोष जाधव, दिलीप माने आदी उपस्थित होते. एम. के. जैनापुरे, ऍड, एस. जी. भावीमनी, डॉ. साजिद टेबला, डॉ. नंदेश्वर, डॉ. सोनाली मांजरेकर, छत्रे गुरुजी, ऍड. मंतेरो, सुशांत शानभाग, गणेश बुक डेपो, रमेश पवार या दानशूरांच्या मदतीतून हा उपक्रम राबविण्यात आला.


Recent Comments