Accident

स्तवनिधीजवळ अपघातात ४ जण जागीच ठार

Share

 पुणेबेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. वर निपाणी स्तवनिधीजवळील उतारावरील वळणावर कंटेनरने कारला धडक दिल्याने जण जागीच ठार झाले. हा अपघात आज शुक्रवारी पहाटे झाला.

या भीषण अपघातात छाया आदगौडा पाटील (वय ५५), आदगौडा बाबू पाटील (वय ५८), महेश पाटील (वय २३) आणि चंपाताई मगदूम (वय ८०) हे चौघेजण जागीच ठार झाले. हे सर्व चिक्कोडी तालुक्यातील बोरगाव वाडीचे रहिवासी असल्याचे समजते. अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

सर्व मृत कारमधून निपाणीजवळील स्तवनिधी येथे एका लग्न समारंभाला जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. यात वधूचा भाऊ महेश पाटील याचाही बळी गेला आहे. घटनास्थळी एसपी लक्ष्मण निंबरगी, डीवायएसपी बसवराज यलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी, पीएसआय कृष्णवेणी गुर्लहोसूर आदींनी भेट देऊन पाहणी केली.

 

Tags: