चिक्कोडी नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आनंद केसरगोप्प यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुजू झाल्यानंतर नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

व्हॉईस : मूळचे मुडलगी येथील असणारे आनंद केसरगोप्प २०११च्या तुकडीचे केएएस अधिकारी आहेत. हल्लूर येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून सेवा बजावत होते. तेथून प्रथमच नगर प्रशासन विभागात त्यांची बदली झाली आहे. चिक्कोडी नगरपंचायत सीईओ म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, चिक्कोडी शहरातील पाणी पुरवठा, गटारी, कचऱ्याची विल्हेवाट अशा कामांना प्राधान्य देऊन नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नगरसेवक अन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments