भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी आ. अनिल बेनके यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या राज्य शाखेकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आलाय.

बेळगावचे विद्यमान महानगर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांची मुदत संपायला अजून ६ महिने बाकी आहेत. तरीही त्यांना हटवून आ. बेनके यांची निवड केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. निवडणुकीच्या वर्षातच शहर अध्यक्ष बदलण्यात आल्याने भाजपच्या गोटातही त्याचे पडसाद उमटले आहेत.
व्हायरल झालेल्या गोवा वारीतील नग्न फोटोंचे प्रकरण शशिकांत पाटील यांच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे. या कृतीची शिक्षा म्हणूनच त्यांना हा दंड देण्यात आला असावा, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसू नये याची दक्षता घेत त्यांची उचलबांगडी केल्याची चर्चा भाजपच्या गोटात दबक्या आवाजात सुरु आहे. त्याशिवाय बेनके याना महानगर जिल्हाध्यक्ष पद देऊन आगामी निवडणुकीत त्यांना दूर सारून दुसऱ्या कोणाला उमेदवारी देण्यात येईल का अशीही चर्चा सुरु आहे.


Recent Comments