Vijayapura

एमटीबी नागराज यांचा यत्नाळांना टोला अन पाठराखणही !

Share

भाजपमध्ये गटबाजी वगैरे काही नाही असे सांगत मंत्री एमटीबी नागराज यांनी . बसनगौडा पाटीलयत्नाळांना विजापुरातच टोला लगावला. मात्र यत्नाळ माजी केंद्रीय मंत्री आहेत, माझे वरिष्ठ आहेत, त्यांना राज्यात मंत्रिपद दिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

विजापुरात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पाठयपुस्तक बदलण्यावरून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर प्रतिक्रिया देताना मंत्री एमटीबी नागराज म्हणाले, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री घेतील. भाजपमध्ये बी. एस. येडियुरप्पा, बी. एल. संतोष अशी गटबाजी वगैरे काही नाही. सगळे नेते भाजपशी एकनिष्ठ आहेत. गटबाजी वगैरे सगळ्या अफवा आहेत.

यत्नाळांना मंत्रिपद मिळण्याबाबतच्या प्रश्नावर नागराज म्हणाले, ते आमचे सिनिअर आहेत. चांगले कार्यक्षम आमदार आणि संघटनाचातुर आहेत. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांना राज्यात संधी मिळायला हवी होती, पण ती मिळाली नाही. मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली. काँग्रेस सोडून चूक केली या नागराज यांच्या कथित विधानावर प्रतिक्रिया देताना मी ते विधान केलेच नाही. कार्यकर्ते तसे म्हणाले असावेत असे त्यांनी सांगितले.

एकंदर मंत्री नागराज यांनी यत्नाळांना टोला लगावतानाच मंत्रिपदासाठी त्यांची पाठराखणही केली आहे. एवढेच नाही तर मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांचा विचार होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

Tags: