संपूर्ण बेळगावची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून हा भाग पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. यामुळे येथील निवासी मनपा अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

व्हॉइस : बेळगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर बनविणे हि बाब स्वप्नवतच आहे याचेच आणखीन एक उदाहरण म्हणजे स्वच्छता कामगारांचा निवासी परिसर. संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी सेवा वाजविणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निवासी भागातच पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आझम नगर येथील पी के क्वाटर्स परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता कामगार राहतात. या परिसरात रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पथदीप यासह अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तसेच या परिसरात साप, मुंगूस आणि इतर किड्यांचाही प्रादुर्भाव वाढला असून या भीतीपोटी मुलांनाही बाहेर पाठविणे मुश्किल बनले आहे.
याच परिसरात मनपा आरोग्य निरीक्षकांचेही कार्यालय आहे. दररोज बेळगाव कार्यालयात जाणारे अधिकारी हि व्यवस्था पाहूनदेखील गप्प का आहेत? असा सवाल येथील महिला उपस्थित करत आहेत. येथे असलेल्या अस्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना विचारण्यात आल्यास एकदाच या ठिकाणी स्वच्छता झाली. मात्र त्यानंन्तर पुन्हा परिस्थिती आहे तशीच राहिली आहे. एकदाच स्वच्छता केल्यामुळे हा भाग स्वच्छ राहणार आहे का? याबाबत जाब विचारण्यात आल्यास गेल्या आठवड्यात स्वच्छता करण्यात आल्याचे सांगण्यात येते. गेल्या आठवड्यात स्वच्छता केली तर या आठवड्यात करण्याची गरज नाही का? गेल्या आठवड्यात जेवण बनविले तर या आठवड्यात बनविण्याची गरज नाही का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. आपण संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी सेवा वाजवितो आपल्या कामाची किंमत नाही का? असे संतप्त सवाल येथील महिलांनी उपस्थित केले.
बेळगाव शहर स्मार्ट सिटी म्हणून प्रगती करत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर झळकताना प्रत्येकजण पाहात आहे. मात्र बेळगावमधील अनेक भाग आजही पायाभूत आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक भागात विकासाचा नामोनिशाण देखील नाही. अनेक भागातील नागरिक प्रशासनाच्या नावाने बोंब मारत आहेत. परंतु प्रशासन मात्र निद्रिस्थ अवस्थेत असल्याचेच दिसून येत आहे. शहरातील अनेक भागातील समस्यांवर तातडीने तोडगा काढून नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असा सूर सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे.


Recent Comments