Vijayapura

विजापूर जिल्ह्यात शेडला आग लागून ३० लाखांचे नुकसान

Share

शेतातील शेडला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाड येथे घडली आहे.

मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाडजवळ आंध्रप्रदेशमधील शेतकऱ्यांच्या लक्ष्मी कॅम्पमध्ये अचानक आग लागून मोठी हानी झाली. आगीत या कॅम्पमधील ३ शेड भस्मसात झाली. त्याशिवाय १ ट्रॅक्टर, ३ दुचाकी, खताचा मोठा साठा, तांदळाची पाकिटे तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू आगीत जळून खाक झाल्या. यामुळे सुमारे ३० लाखाहून अधिक किमतीचे साहित्य भस्मसात झाले आहे. मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.  

 

 

Tags: