विजापूर जिल्ह्यातील बालक विक्री प्रकरणाची चर्चा आता सर्वत्र होत असून या प्रकरणातील बेकायदेशीरपणे मुलांचे संगोपन करणाऱ्या पाच मुलांची रवानगी सिद्धेश्वर दत्तक केंद्रात करण्यात आली आहे.

विजापूर जिल्ह्यात बालकविक्री प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. याला कारणीभूत असलेल्या कंत्राटी तत्वावर कार्य करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक देखील केली आहे.
विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील जिगजीवनगी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी परिचारिका जयमाला बिजापूर विरोधात अनाथ मुलांना बेकायदेशीरपणे पालन पोषण करण्यात आल्याच्या आरोपातून पोलिसांनी अटक केली आहे. विजापूर शहरातील अथणी गल्ली येथील जयमाला विरोधात जिल्हा बालसाहाय्यावानी योजनेच्या संचालिका सुनंदा तोळबंदी यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलीस तपासात जयमालाकडे पाच मुले आढळून आली. जयमालाच्या घरात पाच मुलांचे बेकायदेशीरपणे संगोपन करण्यात येत असल्याचे उघड झाले.
यापैकी ५ वर्षाच्या मुलाला आणि ३ वर्षाच्या मुलीला त्यांच्या घरी सुखरूपपणे पाठविण्यात आले आहे. तर ३ वर्षीय आणखी एका मुलाला शहरातील दरबार गल्ली येथील शांतम्मा हेरकल नामक महिलेकडे महिन्याला ३ हजार रुपये प्रमाणे पालनपोषण करण्यासाठी ठेवण्यात आल्याचीही माहिती यावेळी उघडकीस आली होती. या प्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास घेत आहेत अशी माहिती विजापूरचे पोलीस आयुक्त एच डी आनंदकुमार यांनी दिली.
आणखी एका पाच वर्षीय बालिकेची माहिती या दरम्यान मिळाली असून सदर बालिका हि महाराष्ट्रातील सोलापूर मधील असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक नेमून सोलापूरमध्ये या बालिकेला संरक्षणसह घेऊन जाण्यात आले आहे. जयमालाच्या या प्रकरणाची चौकशी आणि तपास करताना पोलिसांनी कॅमेऱ्यासहितच तपास केला आहे. ()
विजापूरमधील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. जयमालाने ज्या ठिकाणाहून मुलांना आणले आहे, या मुलांना कोणत्या कारणासाठी बेकायदेशीरपणे आपल्याकडे ठेवून पालनपोषण करण्यात येत होते याची सारी चौकशी पोलीस करत आहेत.


Recent Comments