पुरणपोळी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ! परंतु सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक गृहिणीला घरी पुरणपोळी बनविणे शक्य होत नाही. यालाच आता पर्याय म्हणून बेळगावमध्ये नेहरू नगर परिसरात पुरणपोळी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या पुरणपोळी केंद्राच्या माध्यमातून आता प्रत्येकाला आपल्या सवडीनुसार पुरणपोळीचा आस्वाद घेता येणार आहे.

पुरणपोळी हा अनेकांचा आवडता पदार्थ. सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते. मात्र हल्लीच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक गृहिणीला हि गोष्ट शक्य होत नाही. मात्र आता हि मेजवानी बेळगावमधील ‘निम्मं भास्कर्स मने’ येथे मिळू शकेल निम्म भास्कर मने या पुरणपोळी केंद्राच्या १९ व्या शाखेचे उद्घाटन बुधवारी खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, उद्योजक हरीश गुल्बानी, पूनम गुल्बानी यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
यावेळी बोलताना खासदार मंगला अंगडी यांनी पुरण पोळी केंद्राला शुभेच्छा देत पारंपरिक खाद्यपदार्थ असलेल्या पुरण पोळीची चव चाखत खवय्यांनी या केंद्राला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन केले.
यानंतर आमदार अनिल बेनके यांनीही पुरण पोळी केंद्राला शुभेच्छा देत येथील पुरण पोळीची चव चाखली. उत्तम दर्जा आणि अप्रतिम चव असलेल्या पुरणपोळीची चव ग्राहकांनी अवश्य एकदा भेट देऊन चाखावी, असे आवाहन त्यांनी केले. 
बेळगावमध्ये सुरु झालेल्या या १९ व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त १ रुपयाला १ पोळी अशी विशेष ऑफर देखील ठेवण्यात आली आहे. या ऑफरचं लाभ घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी या दुकानात मोठी गर्दी केल्याचेही पाहायला मिळाले. यावेळी ग्राहकांनी इन न्यू नेट्वर्कशी संवाद देखील साधला आहे. पाहुयात ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत …
या शाखेचे संस्थापक भास्कर यांनी बोलताना सांगितले, आपल्याकडे पुरण पोळी, शेंगा पोळी, साखर तुपाची पोळी, सुक्या खोबऱ्याची पोळी, बदाम पोळी, स्पेशल मसाला पोळी असे अनेक पदार्थ तयार केले जातात. आपल्याकडे मिळणाऱ्या पदार्थांची चव चाखण्यासाठी खवय्यांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सतीश पलटणकर, सुनील शिंदे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सध्याच्या फास्टफूडच्या जमान्यात आपले पारंपारिक पदार्थ कालबाह्य होत असल्याचे निदर्शनास येत आहे. धावपळ, आणि अत्यंत घाईगडबडीच्या जीवनशैलीत अनेक पारंपरिक पदार्थांना फाटा देण्यात येत आहे.
मात्र उत्तर कर्नाटकात अशा अनेक ठिकाणी पारंपरिक आहार पद्धती अजूनही सांभाळण्यात येत आहे, याचेच उत्तम उदाहरण म्हणजे निम्म भास्कर्स मने! या उपाहारगृहात प्रत्येक खव्य्य्याने भेट देण्यात काहीस हरकत नाही!


Recent Comments