बेळगाव शहरातील जालगार गल्ली आणि भडकल गल्ली येथे गेल्या दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उद्भवली आहे. अपूर्ण पाणी पुरवठा आणि ड्रेनेज मसिहरित दूषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिक अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

या प्रभागात एल अँड टी अधिकाऱ्यांनी हे कामकाज केले आहे. या परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक वेळा पालिका अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु पालिका अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने हि समस्या अद्याप जैसे थे च आहे, अशी प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
यासंदर्भात आपली मराठीशी बोलताना स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केलाय. गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात हि समस्या सुरु आहे. अनेकवेळा अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास हि बाब आणून देऊन देखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आलेला नाही. पिण्याच्या पाण्याच्या परवठ्यात ड्रेनेजमिश्रित दूषित पाणी येत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल देखील येथील नागरिकांनी उपस्थित केलाय. 
येथील समस्येसंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक शकील मुल्ला म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून हि समस्या नागरिक झेलत आहेत. एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे कामकाज केले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून जनतेला दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे अनेक आजारांनादेखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून हि समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली. ()
प्रभाग क्रमांक ५ मधील उद्भवलेल्या या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. हि समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.


Recent Comments