Belagavi

अखेर भाजपच्या बैठकीत रमेश जारकीहोळी प्रकटले !

Share

 भाजपच्या जाहीर कार्यक्रमांपासून फारकत घेतलेले गोकाकचें . रमेश जारकीहोळी अखेर आज बेळगावात भाजपच्या बैठकीत प्रकटले.

होय, मंत्री पद न मिळाल्याने गेल्या काही महिन्यांपासून बेळगावात होणाऱ्या कोणत्याही भाजप नेत्यांच्या कार्यक्रमांना न फिरकणारे आ. रमेश जारकीहोळी आज मात्र बेळगावात झालेल्या पक्षाच्या बैठकीला आवर्जून उपस्थित होते.

वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यापूर्वी या संदर्भात भाजपने आज बेळगावात बैठक घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या अध्यक्षतेखाली एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीला रमेश जारकीहोळी उपस्थित होते.

बैठकीत बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील अनेक मंत्री, आमदारही सहभागी झाले होते.

 

Tags: