शेतजमिनीतील वाटेच्या वादातून एकाचा भीषण खून केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी तालुक्यातील कामनकेरी गावात घडली आहे.

होय, बसवण बागेवाडी तालुक्यातील कामनकेरी गावातील अशोक कुंबार आणि महादेवप्पा कुंबार या दोन कुटुंबात शेताला जायच्या वाटेवरून जुना वाद होता, तो पुन्हा उफाळून आला. यावेळी भांडणात महादेवप्पा कुंबार याने अशोक कुंबार याचा खून केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. बसवण बागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


Recent Comments