Belagavi

मुलांमध्ये जातीय विषाचे बीज पेरण्यात येत आहे : केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार

Share

आपल्या राज्याचा इतिहास लवकरच बदलण्याच्या मार्गावर आहे. मुलांमध्ये जातीय विषाचे बीज पेरण्यात येत आहे, असा टोला लगावत केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी भाजपाविरोधात विधान केले आहे.

वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रकाश हुक्केरी आणि सुनील संक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बेळगावमध्ये आलेल्या डी के शिवकुमारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर पुन्हा टीका केली आहे. लहान मुलांमध्ये पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाबाबत देखील आतापासूनच विषाचे बीज पेरण्यात येत असून भगत सिंग, नारायण गुरु, गांधीजी, बसवेश्वर, आंबेडकर यांच्या विचारात काही बदल आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे सर्व विद्यावंत, बुद्धिवंत नव्हते का? तर मग या माध्यमातून विष का पेरण्यात येत आहे? असा सवाल उपस्थित करत भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली.

प्रकाश हुक्केरी यांना शिक्षकांनी मतदान करू नये असा भाजप नेत्यांनी आरोप केला आहे यासंदर्भात प्रतिक्रिया देताना डीकेशी म्हणाले, प्रकाश हुक्केरी हे आपले नेते आहेत. शेकडो नेत्यांना घडविण्याची ताकद त्यांच्यात आहे. विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, जिल्हा पंचायत अशा सर्वठिकाणी त्यांचा मोठा अनुभव आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे असे डीकेशी म्हणाले.

लापटॉप वितरणाबाबत होत असलेल्या आरोपसंदर्भात प्रतिक्रिया देताना डीकेशी म्हणाले, आपण कोणतेही लॅपटॉप कुठेही दिले नाहीत. आम्ही मतदारांचे मन जिंकवण्याचे काम केले आहे. दोन्ही हात जोडून आपण मात्याचंना करतो असेही डीकेशी म्हणाले.

सिद्धरामय्या का अनुपस्थित आहेत? यावर प्रतिक्रिया देताना डीकेशी म्हणाले, सिद्धरामय्या म्हैसूरमध्ये मध्ये तर एच के पाटील धारवाड मध्ये आहेत. सिद्धरामय्या यांच्या पाठिंब्यानेच प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असे डीकेशी म्हणाले.

बेळगावमध्ये शिक्षक आणि पदविडर मतदार संघाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या डीकेशींनी आज प्रसारमाध्यमांशी अनेक विषयांवर संवाद साधला आहे.

Tags: