Belagavi

काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी, सुनील संक यांचे उमेदवारी अर्ज दाखल 

Share

 येत्या १३ जून रोजी होणाऱ्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिक्षक मतदार संघातून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी तर पदवीधर मतदार संघातून सुनील संक यांनी अर्ज दाखल केले.

होय, वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी पक्ष नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन शिक्षक मतदार संघातून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी तर पदवीधर मतदार संघातून सुनील संक यांनी अर्ज दाखल केले. निवडणूक अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे त्यांनी आपले अर्ज सादर केले.

यावेळी त्यांच्यासमवेत केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील, केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी व ईश्वर खांडरे, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, डॉ. अंजली निंबाळकर, महांतेश कौजलगी, गणेश हुक्केरी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी तसेच काँग्रेस नेते उपस्थित होते.

 

Tags: